Friday, September 20, 2024
Homeनगरअवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर एलसीबीचा छापा

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर एलसीबीचा छापा

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त || तिघे ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

घरगुती वापराच्या गॅस टाक्यातून (Gas Tank) अवैधरित्या व्यवसायिक गॅस टाक्यात रिफिलिंग (Refilling) करत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. वारूळवाडी (ता. नगर) परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. सोहेल जाकीर शेख (वय 29 रा. पाईपलाइन हाडको, एकविरा चौक, सावेडी), विक्रमसिंह राजबहाद्दुर चव्हाण (वय 35), प्रल्हादसिंह पप्पुसिंह चव्हाण (वय 20, दोघे मुळ रा. उत्तर प्रदेश, हल्ली रा. वारूळवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एच. पी. कंपनीच्या घरगुती वापराच्या 80 रिकाम्या गॅस टाक्या, भारत गॅस कंपनीच्या व्यवसायिक वापराच्या 31 भरलेल्या गॅस टाक्या, 111 रिकाम्या गॅस टाक्या, सहा वजन काटे, सहा गॅस सिलेंडर रिफिलिंग मशिन व मोटार असा एकुण सहा लाख 65 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. सोहेल शेख हा वारूळवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापरा करीता असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून त्यातील गॅस व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलींग करून त्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती.

त्यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार गणेश भिंगारदे, आकाश काळे, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे व उध्दव टेकाळे यांना सोबत घेत सदर ठिकणी छापा (Raid) टाकला. सोहेल शेख याच्याकडे सदर व्यवसायाबाबत विचारपुस केली असता गॅस सिलेंडर रिफिलिंगचा व्यवसाय स्वत:चे मालकीचा असुन घरगुती गॅस सिलेंडर हे जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरकाकडुन घेतल्याचे त्याने सांगितले. शेख याने परवाना न घेता, घरगुती व व्यवसायिक वापराच्या गॅस टाक्या रिफिलिंग व साठा करून ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन, विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस (Bhingar Camp Police) अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या