Friday, May 3, 2024
Homeनगरचार लाखाचा अवैध मद्य साठा जप्त, नेवासा पोलिसांची मोठी कारवाई

चार लाखाचा अवैध मद्य साठा जप्त, नेवासा पोलिसांची मोठी कारवाई

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नेवासा पोलिसांनी तालुक्यातील देवगाव परिसरात छापा टाकून ४ लाख ३६ हजार ८० रुपये किमतीचा बियरचा साठा जप्त केला आहे.

- Advertisement -

याबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तालुक्यातील देवगांव येथील राहणारे ईसम महेश बाळासाहेब दारकुंडे याचे राहते घराचे समोर पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत. अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना राहुल यादव, पोकॉ.गणेश ईथापे यांना सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी रवाना केले.

उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना राहुल यादव व पोकोंगणेश ईथापे यांनी देवगाव येथील महेश बाळासाहेब दारकुंडे याचे राहते घराचे परीसरात जावुन घराचे समोर असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी कासवर्ग कंपनीच्या बिअरचे एकुण १५८ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये १२ बॉटल अशा वर्णनाचा एकुण ४ लाख ३६ हणार ८० रुपये किंमतीच्या बियरच्या बॉटल मिळुन आल्याने सदरचे बॉक्स पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त करुन नेवासा पोलीस ठाणे येथे आणलेल्या आहेत.

याप्रकरणी महेश बाळासाहेब दारकुंडे रा.देवगाव याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना नितीन भताने हे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोना राहुल यादव, पोकों गणेश ईथापे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या