नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
तालुक्यातील बहिरवाडी येथील बेकायदा वाळु उत्खननाचा मुळ पंचनामा तहसिल कार्यालयाने गायब केला व बनावट पंचनामा तयार केल्याचा
आरोप करुन दंड वसुली कारवाई करणे बाबद माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी महसूल मंत्री यांचेकडे केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने आपण केलेल्या चौकशी अहवालासह स्वतः दि.20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी दालनात उपस्थित रहावे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नगरच्या उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.
आदेशात म्हटले की, सुनावणीत सखोल चौकशी एक महिन्यात पुर्ण करुन नियमानुसार कार्यवाही करणेबाबत संदर्भ क्र.445 अन्वये आपणास कळविण्यात आलेले आहे. त्या चौकशीचा जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी अहवालासह आपण स्वतः दि. 20 जानेवारी रोजी समक्ष उपस्थित रहावे असे आदेश जिल्हाधिकारी यांचे वतीने जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद यांनी दिले आहेत.
दरम्यान अपर जिल्हाधिकारी यांनी दि.3 डिसेंबर 2020 रोजी 30 दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणायचे आदेश दिलेले होते. उपविभागीय अधिकारी यांनी 30 दिवसांचा कालावधी लोटून गेला तरीही अद्याप चौकशी पूर्ण केलेली नाही.
दि.14 जानेवारी 2021 रोजी सुनावणी ठेवली होती मात्र ग्रामपंचायत निवडणूकीचे कारण देत नेवासा तहसीलदार, नेवासा मंडळ अधिकारी, बहिरवाडी तलाठी हे सुनावणीस गैरहजर राहिले. त्यामुळे तक्रारदार काकासाहेब गायके यांना सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.