Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

नाशिकरोड : भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आज दि. 9 रोजी समारोप होत असून यानिमित्त परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन (Ganpati Visarjan) केले जात आहे….

- Advertisement -

करोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत नव्हता परंतु यावर्षी शासनाने सर्व निर्बंध उठविल्याने सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी नाशिक रोड परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संख्येमध्ये वाढ झाली होती. दरम्यान आज या सार्वजनिक उत्साहाचा समारोप होत असून नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील विविध ठिकाणी गणपती मूर्तीचे विसर्जन केले जात आहे.

प्रामुख्याने दसक जेलरोड येथील गोदावरी नदी, चेहडी येथील दारणा नदी, तसेच देवळाली गाव, विहित गाव, वडनेर दुमाला या ठिकाणी वालदेवी नदी पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे.

त्याचप्रमाणे महापालिकेच्या (NMC) वतीने आठ ठिकाणी कुत्रिम तलाव तयार करण्यात आले असून त्यात प्रामुख्याने जेलरोड येथील नारायण बापू चौक, चेहडी येथील ट्रक टर्मिनल, जय भवानी रोड येथील निसर्गोपचार केंद्र, शिखरेवाडी मैदान, देवळाली गाव येथील गाडेकर मळा परिसरात असलेल्या जॉगिंग ट्रॅक येथील मैदान दत्त मंदिर रोडवरील शाळा क्रमांक 125 चे मैदान, जेलरोड येथील के एन केला शाळेच्या पाठीमागे असलेल्या प्रस्तावित भाजीपाला मार्केट आदी ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे.

…अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

अनेक मंडळांच्या वतीने स्वतंत्रपणे मिरवणुका काढल्या जात आहे. विसर्जन मिरवणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde), उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नाशिक, नगरची परिस्थिती काय?

दरम्यान जेलरोड दसक येथील गोदावरी नदी व चेहेडी येथील दारणा नदी देवळाली गाव येथील वालदेवी नदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या