मुंबई |
मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे काल विसर्जन काल पार पडले. शनिवारी (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मंडपातून निघाली होती. लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप बाकी होते. गिरगाव चौपाटीवर आज सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा दाखल झाला. मात्र, मूर्तीला नव्या ऑटोमेटेड तराफ्यावर चढवण्याचे तासोनतास प्रयत्न करून यश आले.
विसर्जनासाठी समुद्रातील भरतीमुळे अडचण आणखी वाढली होती . सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी भरती सुरू झाली आणि ११.४० वाजता तब्बल ४.४२ मीटरपर्यंत समुद्राचे पाणी वाढले. समुद्राला ओहोटी लागेपर्यंत लालबागच्या राजाचे विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतल्याने चौपाटीवर उपस्थित असलेल्या लाखो भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि स्वयंसेवकांनी विशेष व्यवस्था केली होती गर्दी असूनही शिस्तबद्ध वातावरण दिसून येत होते.
दरम्यान लालबागच्या विसर्जनाच्या आरतीच्या वेळेस अनंत अंबानी उपस्थित होते. आज रात्री सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.




