Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : परप्रांतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Crime News : परप्रांतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सारोळा कासार शिवारात आढळला मृतदेह

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सारोळा कासार शिवारात एका कडूनिंबाच्या झाडाला 37 वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि रक्तस्राव दिसून आल्यामुळे हा खून असण्याची शक्यता असून, आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाला लटकवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

ही घटना शुक्रवार 28 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सारोळा कासार शिवारातील टेंभी मंदिराजवळील गट क्रमांक 775/1 मध्ये धामणे यांचे शेत आहे. या शेतातील कडूनिंबाच्या झाडाला एक व्यक्ती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बाब स्थानिक शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. मृत व्यक्तीचा मृतदेह बनियन व अंडरवेअरमध्ये आढळून आला असून, त्याच्या डोक्यावर व पायावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आणि रक्तस्राव आढळून आला आहे.

पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला असता, त्याला गळ्यात बांधलेल्या पंच्यामध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड व इतर ओळखपत्र सापडली. त्यावरून मृत व्यक्तीचे नाव पेजनसिंह कुंदनलाल विश्वकर्मा (वय 37, रा. जमालपुरा, भोपाळ, मध्यप्रदेश) असल्याचे स्पष्ट झाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...