Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपेयर्समध्ये कौशिक - कार्तिक जोडीला विजेतेपद

पेयर्समध्ये कौशिक – कार्तिक जोडीला विजेतेपद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Breeze Federation of India) वतीने पुणे (pune) येथील पी.वाय.सी.हिंदू जिमखाना (PYC Hindu Gymkhana) येथे आयोजित

- Advertisement -

राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेच्या (National Bridge Competition) आजच्या अखेरच्या दिवशी भारतीय रेल्वे (Indian Railways) आणि दिल्ली -अ यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी मुसंडी मारत भारतीय रेल्वे संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले.

या अंतिम सामन्यांचे 12 बोर्डचे चार राऊंड खेळविले गेले. पहिल्या फेरीमध्ये रेल्वेच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून 17: 12 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर दिल्ली (delhi) संघाकडून खेळतांना सुभाष गुप्ता, संदीप ठकराल, पूजा बात्रा, महेश बहुगुणा, राजेश्वर तिवारी यांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय साधून आपल्या खेळामध्ये सातत्य राखत दुसरी फेरी 56:13 असा जिंकून 39 गुणांची आघाडी प्रस्थापित केली.

तर तिसर्‍या फेरीमध्येही त्यांनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखत तिसर्‍या फेरीमध्ये 24:19 अशी 06 गुणांची आघाडी मिळविली. त्यानंतर खेळल्या गेलेल्या शेवटच्या फेरीमध्ये दिल्लीच्या खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये सातत्य राखून चौथ्या फेरीमध्ये रेल्वे संघाला 24-24 अशा बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. हि अंतिम लढत 117 : 73 अशा 44 गुणांनी जिंकून कमलाकर राव स्मृती चषक राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

तिसर्‍या क्रमांकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्र -ब संघाने (Maharashtra-B team) तामिळनाडू-ब संघावर (Tamil Nadu-B team) 106: 65 अशा 41 गुणांनी पराभव करून या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. महाराष्ट्राच्या संघात जनक शहा, अनिल शहा, अनिल पाध्ये, सी. पी. देशपांडे ,मिलिंद आठवले आणि राजेश दलाल यांचा समावेश होता.

पेयर्स प्रकारामध्ये आज अखेरच्या दिवशी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीनंतर कौशिक आणि कार्तिक या जोडीने केवळ एक गुणांच्या फरकाने विजेतेपद मिळविले तर एस. के. देवराजां – प्रशांत या जोडीला केवळ एक गुणांच्या फरकाने उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. यावेळी विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

विजेते खेळाडू

  • दिल्ली- अ संघ : सुभाष गुप्ता, संदीप ठकराल, पूजा बात्रा, महेश बहुगुणा, राजेश्वर तिवारी.

  • इंडियन रेल्वे : सुमित मुखर्जी, देबब्रता मुजुमदार,गोपिनाथ मन्ना, संदीप दत्ता, प्रणब रॉय, सायंथन कुशारी.

  • महाराष्ट्र- ब संघ : जनक शहा, अनिल शहा, अनिल पाध्ये, सी. पी. देशपांडे ,मिलिंद आठवले आणि राजेश दलाल.

- Advertisment -

ताज्या बातम्या