Friday, May 3, 2024
Homeनाशिकआपल्यातील कला आपणच ओळखाव्यात : डॉ. भार्गवे

आपल्यातील कला आपणच ओळखाव्यात : डॉ. भार्गवे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विद्यार्थ्यांच्या (Students) वक्तृत्वाच्या, नेतृत्वाच्या खुणा विद्यार्थी विकास मंडळ देत असते. व्यक्तिमत्व विकास घडवत असते. आत्मविश्वास (Confidence) देत असते. यासाठी आपल्यातील कला आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, आणि याच कला सांस्कृतिक मंडळाद्वारे पुढे आणता यायला हव्या, असे प्रतिपादन डॉ. वृंदा भार्गवे (Dr. Vrunda Bhargave) यांनी केले…

- Advertisement -

एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या (HPT Arts & RYK Science College) सांस्कृतिक मंडळ आणि करियर कट्ट्याच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालय प्रांगणातील ‘स्मार्ट कट्टा’ (Smart Katta) येथे प्रमुख अतिथी म्हणून त्या संवाद साधत होत्या.

डॉ. भार्गवे म्हणाल्या की, सुखदा देशपांडे, सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, अभिजीत खांडकेकर यांसारखी कलाकार मंडळी ही सांस्कृतिक मंडळामुळे घडली. हे कलाकार त्यांच्या घडण्याचे श्रेय सांस्कृतिक मंडळाला देतात. तसेच त्या सांगतात, कलांच आकलन व्हावं यासाठी उपक्रम घडायला हवे. उपक्रमांचा वर्षभराचा अजेंडा जाहीर होणे गरजेचे असते.

प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं काम सांस्कृतिक मंडळ करत असते. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या उपक्रमांना प्रतिसाद देत पुढे यायला हवे, सातत्याने सहभाग घ्यायला हवा.

कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायन करून केली. परिचय आणि सूत्रसंचालन अपूर्वा चौधरी आणि प्रार्थना गोसावी यांनी केले.

उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हत्या झालीच पाहिजे’ या पथनाट्याचे सादरीकरण लायब्ररी समोर केले. याचे लेखन आणि दिग्दर्शन अमेय आचार्य याने केले. यानंतर नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाटककार दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सुनील देशपांडे यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रा. डॉ. गणेश गिरी यांनी मानले.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. आनंदा खलाणे, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्या पाटील उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या