Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत डबेवाला भवनाचे उद्घाटन

मुंबईत डबेवाला भवनाचे उद्घाटन

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईकरांची सेवा करणारी डबेवाल्यांशी जशी ही चौथी पिढी आहे, तशीच आमची ठाकरे घरण्याची देखील ही चौथी पिढी आहे. डबेवाले हे मुंबईची लाईफलाईन (Dabewale is the lifeline of Mumbai )असून या लाईफलाईन जगवायला हव्यात, असे उदगार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray ) यांनी रविवारी काढले.

- Advertisement -

मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar )आणि राज्याचे परिवहन मंत्र अनिल परब (State Transport Minister Anil Parab )उपस्थित होते. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी काही जुने किस्से सांगताना तकाहीशा भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

आम्ही शाळेत असताना १९८२ मध्ये साली संप झाला. वडील आणि सख्खे आणि चुलत असे सहा भाऊ घरी बसले. माझा फक्त एकच भाऊ कामाला जात होता. त्यावेळी तो घरात असतानाच आमच्या घरी डबेवाला यायचा. घरी आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ होता याची कल्पना आमच्या बाबांना होती. त्यामुळे त्यांनी डबेवाल्याला सहा चपाती द्यायला सांगितले होते. त्यातील तीन चपाती तो खायचा आणि तीन डब्यात ठेवून द्यायचा अशी आठवण सांगताना महापौरांना अश्रू अनावर झाले.

महापौरांच्या भाषणातील नेमका हाच मुद्या पकडत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, मुंबईकरांची सेवा करणारी आपली जशी ही चौथी पिढी आहे (डबेवाल्यांनी), तशीच आमची देखील ही चौथी पिढी आहे.किशोरी पेडणेकर यांनी डबेवाल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा किस्सा सांगितला. आज त्याच कुटुंबातील मुलगी महापौर झाली असून त्यांनी कार्यक्रमाची फित कापली आहे. डबेवाले हे मुंबईची लाईफलाईन असून लाईफलाईन जगवायला हव्यात, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या