Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआस्थापना खर्चात वाढ; नोकरभरती होईल का?

आस्थापना खर्चात वाढ; नोकरभरती होईल का?

नाशिक । फारूक पठाण Nashik

महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांनी मनावर घेऊन शहरातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा मिळाव्यात तसेच महापालिकेतील अधिकारी व सेवकांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी व्हावा यासाठी विशेष महासभा घेऊन मनपात मानधनावर नोकर भरतीचा Recruitment प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव मागच्या आठवड्यातच प्रशासनाकडे गेला असून आयुक्तांनी याला ग्रीन सिग्नल दिल्यास महापालिकेत मानधनावर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील एकूण 7090 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे 2400 पदे ही अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उपलब्ध सेवकांवर कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेत गेल्या 24 वर्षांपासून नोकरभरती होऊ शकलेली नाही.

वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत शासनाने रिक्त पदांच्या नोकरभरतीला मंजुरी न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अडचणी येत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेत मानधनावर तरी नोकर भरती व्हावी, यासाठी विशेष महासभा घेतली. या एकाच विषयावर विशेष महासभेत सर्वपक्षीय नेत्यांनी नोकरभरतीला काही प्रमाणात विरोध करत जवळपास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. मात्र पुढील प्रवास हा प्रशासकीय असल्यामुळे त्यात काही प्रमाणात अडचण येण्याची शक्यता आहे. मात्र मानधनावर नोकरभरती करण्याचा अधिकार हा महापालिका आयुक्त कैलास जाधव NMC Commissioner Kailas Jadhav यांना असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता विशेष लक्ष लागले आहे.

ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोकर भरतीचा बॉम्ब फोडून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधकांना जोर का झटका दिला आहे. मनपात मानधन भरतीसाठी महापालिका नियम 53/ 3 या कायद्यानुसार महापालिका आयुक्तांना अधिकार आहे. वर्ग 3 व 4 साठी सहा महिने भरती करण्यात येऊ शकते. मात्र नाशिक महापालिकेत भरतीसाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे आस्थापना खर्च असू शकतो. 35 टक्के पेक्षा कमी खर्च असल्यास भरती शक्य आहे. नाशिक महापालिकेचा 2019-20 साली आस्थापना खर्च 29. 83 टक्के होता. त्यावेळेस भरतीप्रक्रिया झाली असती तर काही अडचण नव्हती, मात्र आता 38 टक्के पर्यंत खर्च आहे. यामुळे भरतीसाठी मनपा आयुक्त काय निर्णय घेता हे पाहणे गरजेचे आहे.

नाशिक मनपात 1998 पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. महापौर म्हणून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे. नोकरभरतीची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असून प्रशासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे.

सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक Satish Kulkarni , Mayor, Nashik

- Advertisment -

ताज्या बातम्या