वेलिंग्टन | Welington
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावरील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला असून, यामुळे ही मालिका आता 0-0ने बरोबरीत आहे. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ८ विकेट्स आवश्यक होत्या. तर न्यूझीलंड संघासमोर आपल्या विकेट्स वाचविण्याचे आव्हान होते. न्यूझीलंड ने हे आव्हान पेलले आणि सामना अनिर्णित सोडवला.
विशेष म्हणजे अष्टपैलू डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी खेळपट्टीवर टिकून राहत चिवट फलंदाजी केली. सामना संपण्यासाठी १ तास शिल्लक असताना सामना अनिर्णित सुटणार हे लक्षात घेऊन दोन्ही संघांनी हस्तांदोलन करून परस्पर संमतीने सामना अनिर्णित सोडवला. दिवसाचा खेळ पूर्ण झाला तेव्हा न्यूझीलंड ने १२० षटकांत ५ बाद २३९ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडला अजूनही ११३ धावांची गरज होती. दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा रचिन रवींद्र 27आणि डेव्हिन कॉनवे 59 वर खेळत होते. दोघांनी सुरुवातीची 10 षटके खेळून काढून संघाचा डाव सांभाळला वॉशिंगटन सुंदर ने डेव्हिन कॉनवेला 65 वर बाद करत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कडे झेलबाद केले आणि ही जोडी फोडली.
A draw it is in the Wellington Test.
Both teams share the honours after a hard-fought contest.
#TeamIndia will now aim to win the series in the 2nd #NZvIND Test in Christchurch 🇮🇳
Scorecard ▶️ https://t.co/SaMcNXtAVG https://t.co/GF8A2ALHbD— BCCI (@BCCI) November 23, 2026
त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने रचिन रवींद्र ला 37 वर के एल राहुल कडे झेलबाद बाद केले. यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल ने डॅरेल मिचेल सोबत संघाला सावरण्याचे आव्हान होते. सामन्याच्या 74व्या षटकांत डॅरेल मिचेलला धावचीत करण्याची संधी होती. पण आकाशदिपकडून ही संधी हुकली. त्यानंतर अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर शुभमन गिल ने घेतलेला डीआरएस यशस्वी ठरला टॉम ब्लंडेल 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर डॅरेल मिचेलने ग्लेन फिलिप्स सोबत खेळपट्टीवर टिकून राहत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. ग्लेन फिलिप्स 26 डॅरेल मिचेल 41 वर नाबाद होऊन तंबूत परतला. हेन्री निक्लस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, भारतीय संघाकडून प्रसिद्ध कृष्णा ने २ तसेच अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह ने १-१ गडी बाद केले. मालिकेतील पुढील सामना शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर होणार आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये अखेरचा कसोटी विजय 2014 मध्ये मिळवला होता. त्यामुळे वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघाने निर्माण केलेली विजयाची संधी पाहता हा दुष्काळ संपेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, मिचेल आणि फिलिप्स यांच्या भागीदारीमुळे भारताला विजयापासून दूर राहावे लागले. परिणामी, न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
दोन्ही संघांना फटका
आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान कायम ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नावावर 75.00 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांच्या नावावर 69.23 गुण आहेत. टीम इंडियाविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे न्यूझीलंडला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
या ड्रॉमुळे न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी घसरला आणि भारत चौथ्या स्थानावर राहिला असताना टीम इंडियाला आगामी सहाच्या सहा मॅच जिंकणे, उत्तम टॅलेंन्ट अन् खूप मोठ्या लकची गरज आहे. WTC च्या फायनलमध्ये पोहोचणं फक्त भारताच्या हातात राहिलेले नाही. वेलिंग्टनमध्ये 8 पॉइंट्स गमावल्याने पुढील सामन्यांत चांगली कामगिरी करूनही इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागेल. गती मिळवण्यासाठी भारताला क्राईस्टचर्चमधील दुसऱ्या कसोटीत विजय आवश्यकच आहे.
विशेषतः ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या चार कसोटीं मॅचवर सगळं काही अवलंबून आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित सात कसोटी मॅचवर टीम इंडियाचं भविष्य अवलंबून असेल. टॉपच्या चारही टीम्स एकमेकांना भिडत आहेत.




