त्रिमूर्ती चौक ते दत्तमंदिर चौकादरम्यान सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर
नाशिक | प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचा परिसर असलेल्या शालीमार भागात अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर विक्रेत्यांसह विविध व्यावसायिकांनी जागा व्यापल्याने या भागात वाहतुकीचा बिकट झाला आहे. तर पायी चालणाऱ्यांना वाट मिळेना, असे चित्र आहे. प्रश्न अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणेही कठीण झाले असून, वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शहराच्या मध्यवर्ती भागातील हा प्रश्न अनेक दिवसांपासून कायम असतानाही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शालीमार परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरू असते. विविध कार्यालये, व्यावसायिक आस्थापना, दुकाने आणि बाजारपेठेमुळे या भागात कायम वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर अतिक्रमणे वाढल्याने उपलब्ध रस्त्याची जागा कमी होत आहे. काही ठिकाणी विक्रेत्यांनी पदपथावरच दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.
शालीमार परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी असते. त्यातच रस्त्याच्या कडेला वाढलेली अतिक्रमणे आणि अनियंत्रितपणे उभी राहणारी बाहने यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. चाहनधारकांना कसरत करावी लागते, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रस्ता ओलांडतानाही अडचणींचा सामना करावा लागतो.
बिसलेरीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; FSSAI कडून खटल्यास मंजुरी, कंपनीनेही मांडली बाजू
हप्तेखोरीचे आरोप
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील विविध भागांत वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, शालीमार परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न कायमत्त्वरूपी सुटलेला नाही. कारवाई झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या भागातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत तसेच काही ठिकाणी कथित हप्तेखोरी होत असल्याच्या आरोपांबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांची महापालिका प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे. अतिक्रमणांना कोणाचे अभय आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.
त्रिमूर्ती चौकातील कामाने वाहनांचा खोळंबा
त्रिमूर्ती चौक ते दत्तमंदिर चौकादरम्यान सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. याठिकाणी सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अवघे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्घा ते तास लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.




