Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik Crime News : माॅर्फ फाेटाेद्वारे भुजबळांची बदनामी; इन्स्टाग्राम खाते डिलिट करून...

Nashik Crime News : माॅर्फ फाेटाेद्वारे भुजबळांची बदनामी; इन्स्टाग्राम खाते डिलिट करून पलायनाचा डाव

सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​सोशल मीडियावर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून बदनामीकारक मजकूरासह प्रसिद्ध केल्यानंतर, संबंधित संशयिताने इन्स्टाग्राम खातेच डिलिट केल्याची बाब समोर आली आहे. केवळ राजकीय टीका-टिप्पणी न करता डिजिटल छेडछाडीद्वारे प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

​पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, नवीन सिडको येथील रहिवासी हर्षल श्रीधर खैरनार (वय ४३) यांनी याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. खैरनार हे दैनंदिन वापरासाठी इन्स्टाग्राम वापरत असताना त्यांना एका खात्यावर छगनराव भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो बदलून पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. या फोटोंवर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून भुजबळांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

एका पोस्टमध्ये (Post) तर दोघांचा एकत्रित फोटो मॉर्फ करून त्यावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात संशयिताने २० नोव्हेंबरपूर्वी इन्स्टाग्रामवर बनावट किंवा नवीन खाते तयार करून त्याद्वारे भुजबळ यांचे वैयक्तिक फोटो मिळवले आणि त्यात डिजिटल पद्धतीने बदल केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि गुन्हा दाखल होण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर संबंधित इन्स्टाग्राम खाते डिलिट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, खाते डिलिट केले असले तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर पोलिसांनी (Cyber Police) पावले उचलली आहेत.

​आयटी अ‍ॅक्टसह बीएनएस अन्वये गुन्हा

प्रकरणात अज्ञात संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ४३, ६६, ६६(क) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला गोविंद कोल्हे करीत आहेत. पोस्ट अपलोड करण्यासाठी वापरलेले मोबाइल किंवा संगणक, आयपी अ‍ॅड्रेस, लॉगिन लोकेशन, खात्याशी जोडलेला ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक आणि इतर तांत्रिक तपशील संबंधित प्लॅटफॉर्मकडून प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : आडवळणी डोंगरात दीड काेटींची गांजाशेती; नाईकवाडी शिवारात...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वरपासून (Trimbakeshwar) हाकेच्या अंतरावर असलेल्या नाईकवाडी शिवारात (Naikwadi Shivar) अंबाडा व टोमॅटो पिकांच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशिर गांजा लागवडीचा नाशिक...