Monday, May 20, 2024
Homeक्रीडाIND vs NZ T20 : वर्ल्डकपनंतर आज भारताचा पहिला सामना, हार्दिक पांड्याच्या...

IND vs NZ T20 : वर्ल्डकपनंतर आज भारताचा पहिला सामना, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडशी करणार दोन हात

वेलिंग्टन | Wellington

भारतीय क्रिकेट संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आजपासून ३ सामन्यांची टी २० मालिकेने पुन्हा एकदा नवं मिशन सुरु करण्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया मधील पराभव मागे सारून न्यूझीलंड संघाचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे. पहिला सामना वेलींग्टन येथे होणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघासाठी ही मालिका कठीण असणार आहे. कारण ही मालिका न्यूझीलंडच्या धर्तीवर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील हवामानाशी जुळवून घेण्याचं भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. या मालिकेतून नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार लोकेश राहुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी निवडलेल्या चमूत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. नेतृत्वात त्यामुळे हार्दिक पांड्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघामध्ये लोकेश राहुल रोहित शर्मा ही जोडी सलामीला येते. माञ त्यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलसोबत सलामीला कोणाला संधी द्यायची असा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर निर्माण झाला आहे.

शुभमन गिलसोबत सलामीसाठी ईशान किशन, रिषभ पंत हे पर्याय आहेत. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार ? ते पाहणं महत्वाचं असणार आहे. ईशान किशनने भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावली आहे. पण अनेक सामन्यांमध्ये तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला आहे.

भारतीय संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रिषभ पंत उपकर्णधार असणार आहे. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं प्रशिक्षकपद व्हीव्हीएस लक्ष्मण सांभाळणार आहे. तर भारतीय संघाकडून टी २० सामन्यांमध्ये पदार्पण करण्यासाठी शुभमन गिल उत्सुक असणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स आणि डीटूएच आणि अमेझॉन प्राईमवार करण्यात येणार आहे. तसेच सर्व टी २० सामने भारतीय वेळेनुसार सकाळी १२ वाजता सुरु होणार आहेत. हार्दिकच्या कर्णधार म्हणून पहिल्या मालिकेत भारतीय संघाने आयर्लंड दौऱ्यावर २ सामन्यांच्या टी २० मालिकेत २-० असे यश संपादन केलं होते. भारत न्यूझीलंड पहिल्या टी २० सामन्यावर पावसाचं सावट आहे.

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या