Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक महापालिकेचे नगरसेवक गुरमित बग्गा यांचा राजीनामा

नाशिक महापालिकेचे नगरसेवक गुरमित बग्गा यांचा राजीनामा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या गुरमित बग्गा (Independent Corporator Gurmit bagga resigned today) यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. बग्गा यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकमधील कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद रिक्त आहे. बग्गा यांची या जागी नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, भाजप आगामी महापालिकेची तयारी करत असतानाच आता वाली नसलेल्या कॉंग्रेसला धडाकेबाज, स्पष्ट वक्ता असलेल्या गुरमित बग्गा यांच्या रूपाने शहराध्यक्ष मिळाला तर अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

थोड्या वेळेपूर्वीच मी अपक्ष नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच कॉंग्रेस पक्षात आपण परतलो आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम पाहणार आहे.

गुरमीत बग्गा, माजी नगरसेवक नाशिक मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या