Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजHockey Asia Cup 2025 : दक्षिण कोरियाला नमवून भारत चौथ्यांदा हॉकी आशिया...

Hockey Asia Cup 2025 : दक्षिण कोरियाला नमवून भारत चौथ्यांदा हॉकी आशिया कपचा विजेता

दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले आहे.

चौथ्या क्वार्टरमध्ये, अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. दक्षिण कोरियाकडून सन ड्युनने एकमेव गोल केला.अंतिम सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताकडून सुखजीत सिंगने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने आणखी एक गोल केला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीतने आणखी एक गोल केला.

भारताने अंतिम सामन्यात ५ वेळा विजेत्या दक्षिण कोरियाला हरवून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने २०१७ मध्ये अंतिम सामन्यात मलेशियाला हरवून शेवटचा आशिया कप जिंकला होता. कोरिया दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. २००७ मध्ये अंतिम सामन्यातही भारताने संघाचा पराभव केला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...