Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशभारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणाव

भारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणाव

नवी दिल्ली –

भारत-चीन सीमेवर अभूतपूर्व तणावाची स्थिती असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. यावर वाटाघाटीतूनच तोडगा

- Advertisement -

काढायला हवा असेही ते म्हणाले.

दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलिकडेच रशियात मॉस्कोमध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये चर्चाही झाली होती. यानंतर जयशंकर यांनी पहिल्यांदाच हे विधान केलं आहे. रशियात मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची काही दिवसांपूर्वीच अडीच तास बैठक झाली.

प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावादरम्यान ही बैठक झाली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत सीमेवरील तणाव संपवण्यासाठी पाच-कलमी करार झाला. त्याच वेळी, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहतील आणि सैन्य हटवण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येईल, यावर सहमती झाली होती. मात्र विश्‍वासघातकी चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न सुरुच आहे.

दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्नही सुरू आहेत. या दरम्यान, चीनला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताकडूनही सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. एकीकडे सीमेवर सैनिकांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे सीमेवर कमीत कमी वेळेत पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधांवरही भर देण्यात येत आहे. दुसरीकडे चीननेही सीमेवर आपले सैन्य वाढवले आहे.

भारतीय हवाई दलानेही चीनच्या कुठल्याही चालीला उत्तर देण्यासाठी आपली सतर्कता वाढवली आहे. हवाई दलाने सीमा क्षेत्रात आपली कार्यक्षमता वाढवली आहे. त्याच वेळी, सध्याच्या अडचणींसह, हिवाळ्यासाठी सर्व तयारीची पडताळणी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या