Friday, July 3, 2026
Homeदेश विदेशदेशात करोना प्रसाराचा वेग मंदावला – आरोग्यमंत्री

देशात करोना प्रसाराचा वेग मंदावला – आरोग्यमंत्री

सार्वमत

नवी दिल्ली – देशात करोना विषाणूचा वेग मंदावला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की आपण करोना विषाणूच्या संक्रमणाच्या स्थिरतेकडे जात आहोत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. तसेच, देशाला आशा आहे की येत्या काही आठवड्यांत आपण या कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यात यशस्वी होऊ शकतो, असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

ते म्हणाले, देशामध्ये करोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 19.36 टक्क्यांवर पोहचले आहे, तर करोनाबाधित रुग्णांचे दुप्पट होण्याचे प्रमाणही हळुहळू कमी होत आहे. गेल्या सात दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनाचे संक्रमण 9 दिवसानंतर दुप्पट होत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये हे प्रमाण 7.2 टक्के झाले आहे. हा बदल परिस्थिती सुधारण्याचे संकेत दर्शवत आहे.

देशातील 136 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. 276 जिल्हे ऑरेंज झोन आहे. याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तर देशातील 733 जिल्ह्यांपैकी 321 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण नाही. तसेच, आतापर्यंत आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे 72 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...