Saturday, May 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia Pakistan War : भारतीय सैन्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; चौक्या अन् दहशतवादी...

India Pakistan War : भारतीय सैन्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; चौक्या अन् दहशतवादी लाँचपॅड केले उद्ध्वस्त, Video आला समोर

नवी दिल्ली | New Delhi

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकविरोधात मोठी कारवाई करत ५ धाडसी निर्णय घेतले. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जीव गेला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात तणाव वाढला होता. दहशतवाद्यांना कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. या हल्ल्याच्या १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. यात पाकच्या १०० किमी आत जाऊन भारतीय सैन्याने दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.

- Advertisement -

यानंतर आता भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तान ज्या ठिकाणांहून ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली आहेत. भारतीय लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली देखील सक्रिय केली आहे. पाकिस्तानमधील किमान चार हवाई तळांवर भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य करण्यात आले होते. भारतीय लष्कराने या भागात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली देखील सक्रिय केली आहे. या ठिकाणाहूनच दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत होते. गुप्तहेर खात्याच्या अचूक माहितीनंतर हा लाँचपॅड नष्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून (Pakistan) मध्यरात्री भारतावर हल्ले करण्यात येत आहे. पीओके आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने रात्रीच्या वेळी भारतावर (India) जवळपास ३० हून अधिक भागात ड्रोन द्वारे हल्ला चढवला. हा हल्ला भारताय लष्कराने परतावून लावला. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील रहिवाशी भागांना लक्ष केले. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतावून लावले.

पाकिस्तानने २६ ठिकाणांना केले होते लक्ष्य

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री २६ शहरांवर ड्रोन हल्ला करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमपुढे ड्रोन आणि मिसाईल टिकली नाहीत. भारताच्या २६ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. हवेतच ड्रोन आणि मिसाईलचा धुव्वा उडवण्यात आला. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी एकामागून एक स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आले. सध्या नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crop Insurance : आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांना आता पीक...