Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशCorona Update : दिलासादायक! तब्बल १३२ दिवसानंतर भारतातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या...

Corona Update : दिलासादायक! तब्बल १३२ दिवसानंतर भारतातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या खाली

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, गेल्या काहीदिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. मात्र, आज मोठा दिलासा मिळाला आहे. देशात चार महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्या ३० हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवे करोना रुग्ण आढळले असून ४१५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख २१ हजार ३८२ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या ३६ तासात ४२ हजार ३६३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०६ लाख २१ हजार ४६९ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ३ लाख ९८ हजार १०० रुग्णांवर उपचार आहेत.

सध्या देशातील ८ राज्यात कडक निर्बंध आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडु, मिझोराम, गोवा, पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. याठिकाणी आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. राज्यात दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात काल ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ४६ हजार १०६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या