Thursday, July 4, 2024
Homeक्राईमIND vs CAN : विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज

IND vs CAN : विजयी चौकार मारण्यासाठी टीम इंडिया सज्ज

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेमध्ये आज शनिवार (दि. १५ जून) रोजी भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा येथील ब्रोवार्ड काउंटी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळविण्यात येणार आहे. आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी कॅनडाला विजय अनिवार्य असणार आहे. भारतीय संघाने (Indian Team) आपल्या सलामीच्या तिन्ही सामन्यात पाकिस्तान, आयर्लंड आणि अमेरिकाविरुद्ध शानदार विजय संपादन केला आहे.

हे देखील वाचा : IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत

त्यानंतर आता सलग चौथ्या सामन्यात विजय संपादन करून सुपर ८ मध्ये आत्मविश्वासाने उतरण्यासाठी भारताचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर कॅनडाची धुरा साद बिन जाफर यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे भारत आणि कॅनडा यांच्यात प्रथमच टी २० सामना होत आहे. आयर्लंड विरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रोहित शर्माला मागील दोन्ही सामन्यात आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. याशिवाय माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील तीन सामन्यात केवळ ५ धावा करू शकला आहे.

हे देखील वाचा : IND vs USA : भारत-अमेरिका आज भिडणार; पाकिस्तानचा सुपर-८ चा प्रवेश टीम इंडियाच्या हातात

तसेच सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे (Suryakumar Yadav and Shivam Dubey) यांनी अमेरिका विरूध्द अखेरच्या सामन्यात निर्णायक भागीदारी रचून भारतीय संघाचा विजय सुकर केला होता. तसेच गोलंदाजीत अर्शदिपसिंग, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल संघाला मोक्याच्या क्षणी बळी मिळवून देत आहेत. तर कॅनडासाठी निकोलस किरटन, एरोन जॉन्सन यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत साद बिन जफर, डिलन हेलिंगर, जेरिमी गोरडन हे गोलंदाज संघाला सातत्याने बळी मिळवून देत आहेत.

हे देखील वाचा : क्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

दरम्यान, फ्लोरिडा येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६७ असून आतापर्यंत खेळविण्यात आलेल्या १६ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ सामन्यात सरशी साधली आहे. तर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या टी २० सामन्यात वेस्टइंडिज संघाने भारतीय संघाचा १ धावेने पराभव केला होता. त्यावेळी भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुलने शानदार शतक झळकावले होते. तर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजी करता वरदान मानली जात असून
सामन्यावेळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान (IMD) खात्याने वर्तवली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या