Friday, September 11, 2026
Homeनाशिकस्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा उपक्रम म्हणजेच 'प्रिय मी' - रेश्मा कारखानीस

स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा उपक्रम म्हणजेच ‘प्रिय मी’ – रेश्मा कारखानीस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

महिलांना स्वतःची ओळख करून घेण्यास, स्वतःच्या मनात डोकावण्यास आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रवृत्त करणारा तसेच स्वतःभोवती अंतर्मुख करणारा उपक्रम म्हणजेच “प्रिय मी” हा स्वतःनेच स्वतःला पत्रलेखन करण्याचा उपक्रम , या उपक्रमामुळे महिलांना आत्मपरीक्षणाची नवी दृष्टी मिळाली असे प्रतिपादन लाडशाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळ, नाशिक द्वारे आयोजित प्रिय मी या पत्रलेखन उपक्रमाच्या सन्मान सोहळयात बोलतांना कार्यक्रमाच्या विशेष अतिथी लेखिका, कवयित्री, दिग्दर्शिका व अभिनेत्री रेश्मा कारखानीस यांनी केले. त्या म्हणाल्या की नवहितगुज मंडळ म्हणजे नवनवीन उपक्रम राबवून महिलांचे हित जोपासत त्यांच्याशी गुज करणारे हे तुमचे मंडळ म्हणजेच नवहितगुज होय. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रिव्हेरिया रिसॉर्ट चे संचालक .संजय पाखले , संचालिका अलका पाखले उपस्थित होत्या.

संजय पाखले यांनी आपल्या मनोगताद्वारे उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देत, मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्कारवाणी वुमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नवहितगुज गोल्डन स्टार मधील सर्व खेळाडूंनी सांघिक भावनेने खेळ करत उपविजेतेपद प्राप्त केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले . या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्याला ,कर्तृत्वाला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळणे ही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. अलका पाखले यांनीही मंडळास शुभेच्छा दिल्यात.

सुरुवातीस अतिथींचे औक्षण करून पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले . दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले . व्यासपीठाजवळ साकारण्यात आलेली पोस्टपेटी आणि उपविजेतेपदाचा चषक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. या प्रसंगी रेश्मा कारखानीस यांनी सादर केलेली कृष्णार्थाची भावस्पर्शी झलक उपस्थितांच्या मनाला भावली आणि सर्वांच्याच हृदयात विशेष स्थान निर्माण करून गेली. तसेच गोदामाई पत्रमित्र दत्ताभाऊ कोठावदे यांची पोस्टमनच्या भूमिकेतील पत्रवारी सर्वांनाच आकर्षित करून गेली , राजेश कोठावदे यांनी केलेले आवाहन महिलांना जागृत करून गेले.

प्रास्तविक सादर करताना मंडळाच्या सल्लागार व माजी अध्यक्ष संध्या कोठावदे यांनी मंडळाच्या “आत्मनिर्भर नारी – समाज सक्षमीकरणाची वारी ” या उपक्रमाची माहिती देतानाच महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासोबतच त्यांच्या कौशल्यांना आणि कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी मंडळामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत सादर करताना प्रतिभा वाणी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या प्रिय मी या पत्रलेखन उपक्रमाविषयी बोलताना यात सहभागी नाशिक तसेच पुणे , मुंबई , सटाणा , धुळे , मालेगाव , बंगलोर, जयपूर असे अनेक ठिकाणाहून सहभागी प्रत्येक महिला स्वतःला प्रिय असल्याने आणि प्रत्येकाची एक संघर्षमय कहाणी असल्याने कोणा एकाला विजयी घोषित न करता आम्ही सर्वांनाच विजयी घोषित केले, तसेच क्रिकेट स्पर्धेतही आमच्या नवहितगुज गोल्डन स्टार अवघ्या दोन धावांनी जरी उपविजेता ठरला तरी मी आमच्या या संघाच्या खिलाडूवृत्ती चे मनापासून कौतुक करते असे प्रतिपादन केले .

“प्रिय मी” या पत्रलेखन उपक्रमाला अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातील सर्व सन्मानार्थीं सखींचा गौरव करण्यात आला. तसेच संस्कारवाणी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या ‘नवहितगुज गोल्डन स्टार’ संघातील सर्व खेळाडूंचा सहपरिवार विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमातील मनोरंजनाची जबाबदारी निवेदिका मोनाली कोठावदे यांनी समर्थपणे सांभाळली. विविध मजेदार खेळांच्या माध्यमातून त्यांनी महिलांना हसत-खेळत सहभागी करून घेतले. महिलांनी या खेळांचा मनमुराद आनंद घेतला आणि अनेकांना आकर्षक बक्षिसेही मिळाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चारुलता शिरोडे, परिचय रूपाली वाणी व नयना अमृतकर, तर आभार प्रदर्शन रूपाली येवले यांनी केले.

कार्यक्रमास लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश मालपुरे, विश्वस्त राजेश कोठावदे , ज्येष्ठ पत्रकार तसेच इंदिरानगर वाणी मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश अलई , संस्कारवाणी युवक मंडळाचे अध्यक्ष भूषण सोंजे, अशोक नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य अधिकारी सविता अलई, नाशिक प्रबोधन महिला आघाडी अध्यक्ष चैताली अमृतकर, नवहितगुज महिला मंडळाच्या सर्व माजी अध्यक्षा, विभागीय महिला मंडळाच्या अध्यक्षा, तसेच समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिभा वाणी, प्रणाली बागड, चारुलता शिरोडे,रुपाली येवले, लीना बागड, सीमा सोनजे, संध्या कोठावदे , उज्ज्वला कोठावदे, सरिता शिरुडे , पल्लवी वेढणे, रुपाली वाणी ,नयना अमृतकर , प्रांजल कोठावदे ,वैशाली कोठावदे , सुनीता वाणी , मोनाली अमृतकर , सुनंदा दशपुते , नीलिमा चिंचोरे, संगीता अमृतकर , दीपाली वाणी तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. खऱ्या अर्थाने ‘सन्मान स्त्री मनाचा, सन्मान स्त्री शक्तीचा, सन्मान स्त्री जाणिवेचा’ या भावनेतून साकारलेला हा सोहळा आत्मसंवाद, कर्तृत्व, आत्मनिर्भरता आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरला.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना ‘एस. एस....

0
नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२६ : जिमाका वृत्तसेवा Nashik सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक...