Friday, October 23, 2026
Homeनगरकोल्हार भगवतीपूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रवासी बालंबाल बचावले

कोल्हार भगवतीपूर येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रवासी बालंबाल बचावले

कोल्हार ( वार्ताहर )

कोल्हार भगवतीपूर येथील काळामळा शिवारात दुधाचा टँकर आणि व्हॅगनआर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी तथा गंभीर दुखापत झाली नसली तरी तिन्ही वाहनांचे व रस्त्याकडेला असलेल्या एका बंगल्याच्या कठड्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (११ सप्टेंबर) दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दुधाचा टँकर (क्र. एम एच १७ ए जी ८१५८ ) हा संगमनेरकडून दूध भरून राहुरीच्या दिशेने चालला होता. त्याचवेळी समोरून येणारी व्हॅगनआर कार (क्र. एम एच ०२ पीए ९९७८ ) ही संगमनेरच्या दिशेने जात असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडक लागल्यानंतर टँकर चालकाचा ताबा सुटला आणि टँकर रस्त्याकडेला असलेल्या एका बंगल्याच्या बाहेरील कठड्यावर जाऊन जोराने आदळला. यामुळे बंगल्याचा कठडा तुटून टँकरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या बाजूला धडकेच्या तीव्रतेमुळे व्हॅगनआर कारचा तोल गेला आणि ती टँकरच्या मागून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या एक्सयूव्ही ( क्र.  २४ बी एच ७३७६ एच) कारवर जाऊन आदळली. यात दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले.

अपघाताच्यावेळी व्हॅगनआर कारमध्ये कुटुंबातील ३ महिला आणि २ पुरुष प्रवास करत होते. तर एक्सयूव्ही कारमध्ये पती-पत्नी, त्यांचा १८ महिन्यांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी असा परिवार प्रवास करत होता. सुदैवाने या तिहेरी अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ ऑक्टोबर २०२६ – सामाजिक संघर्षाच्या मेळाव्यांची मांदियाळी

0
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दसरा मेळाव्यांना ऐतिहासिक महत्त्व असले, तरी यंदाचे मेळावे पारंपरिक शक्तिप्रदर्शनापेक्षा स्फोटक राजकीय व सामाजिक संघर्षाचे केंद्र ठरले. शिवसेना शिंदे आणि ठाकरे...