Friday, May 3, 2024
Homeक्रीडाINDvsENG 3rd ODI : इंग्लंडने नाणेफेक जिंकली

INDvsENG 3rd ODI : इंग्लंडने नाणेफेक जिंकली

पुणे | Pune

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशच्या गहुंजे, पुणे येथे होत आहे.

- Advertisement -

या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लडच्या जोस बटलरने नाणेफेक जिंकली आहे. इंंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करून भारताच्या आव्हानाचा पाठलाग करणार आहे.

दरम्यान, भारतीय संघात फिरकीपटू कुलदीप यादव याला आराम देऊन आणखी एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या टी.नटराजन याला आजच्या निर्णायक लढतीसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघात एक फिरकीपटू कमी करुन त्याजागी वेगवान गोलंदाजाला संधी देण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे कुलदीपच्या जागी संघात यजुवेंद चहलचं पुनरागमन होईल अशी चर्चा होती. पण चहलला संधी न देता टीम इंडियानं टी.नटराजनला संघात जागा दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या