Friday, May 3, 2024
Homeक्रीडाभारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा T20 सामना

भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा T20 सामना

मुंबई | Mumbai

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात ३ सामन्यांच्या टी २० मालिकेचा थरार सुरु आहे. रांची (Ranchi) येथील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आज लखनऊ (Lucknow) येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना मैदानावर दुसरा टी २० सामना सायंकाळी ७ वाजता खेळविण्यात येणार आहे…

- Advertisement -

पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला असून केन विलियम्सन,टीम साऊथी, टॉम लॅथम या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिचेल सँटेनरच्या नेतृत्वात आपली पहिली मालिका खिशात घालण्यासाठी नवीन डावपेच आणि रणनीती आखून मैदानात उतरण्यासाठी सज्ज असणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या टी २० सामन्यात विजय मिळवून भारताकडे मालिकेत (Series) पुनरागमन करण्याची संधी असेल. तसेच रांची येथील पहिल्या सामन्यातील चुका सुधारण्याची संधी देखील असणार आहे. तर लखनऊ येथील मैदानावर आतापर्यंत एकूण ५ टी २० सामने खेळविण्यात आले असून भारताने २ सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही सामन्यात भारताचा विजय झाला आहे.

सलील परांजपे ,नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या