Friday, September 20, 2024
Homeदेश विदेश26 ऑक्टोबरपासून भारतीय लष्कराचे 4 दिवसीय संमेलन

26 ऑक्टोबरपासून भारतीय लष्कराचे 4 दिवसीय संमेलन

नवी दिल्ली –

- Advertisement -

येत्या 26 ऑक्टोबरपासून भारतीय लष्कराचे चार दिवसीय संमेलन सुरू होत आहे. यामध्ये सैन्यातील प्रमुख अधिकारी

सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे असणार आहेत. Army Chief General Manoj Mukund Naravane

चीन-भारत तणाव, जम्मू-काश्मीर ऑपरेशन, लष्करातील काही सुधारणा, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात करणे अशा अनेक प्रस्तावांवर या संमेलनामध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान लडाखमधील चीनसोबतचा वाद सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात चीन-भारतादरम्यान चर्चा होणार आहे. चर्चेचीही आठवी फेरी असणार असून 12 ऑक्टोबरला सातवी फेरी झाली होती. गेल्या मे महिन्यापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव असून चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चेतून अद्याप मार्ग निघालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या