मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने गुरुवारी (३० जुलै) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून आपल्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट असल्याची घोषणा केली. “Cap No. 278, Signing Off” असा उल्लेख करत त्याने बीसीसीआय, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले.
ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोत्तम कामगिरी
अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून दिली, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्णक्षण मानला जातो. मेलबर्न कसोटीत केलेले शतक आणि मालिकेतील नेतृत्व आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तो भारतीय संघाबाहेर होता. एकेकाळी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासोबत भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भक्कम आधारस्तंभ असलेला रहाणे, घसरत्या फॉर्ममुळे संघाबाहेर गेला. त्याने भारतासाठी अखेरचा कसोटी सामना २० जुलै २०२३ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा शेवटचा सामना २०१८ मध्ये, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला होता.
पडसाद : बँक संचालकांची कालमर्यादा, वास्तव काय?
अजिंक्य रहाणे हा त्या निवडक भारतीय खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचा कर्णधारपदाचा विक्रमही उत्कृष्ट होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सहा सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, ज्यात संघाने चार सामने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. विशेष बाब म्हणजे, त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला कसोटी क्रिकेटमध्ये एकाही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रहाणेने तीन सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, ज्यात भारताने विजय मिळवला. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, ज्यात भारताने एक सामना जिंकला आणि एक गमावला.
सोशल मिडियावर भावनिक पोस्ट
निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर लिहिले, “जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक शेवटही. तो क्षण आला की त्याचा सन्मान करून पुढे जाणं गरजेचं आहे. माझ्या फलंदाजीप्रमाणेच मी योग्य वेळेवर नेहमी विश्वास ठेवला आणि आज मला वाटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.”
अजिंक्य रहाणेची कारकिर्द
सामने: ८५ कसोटी, ९० एकदिवसीय (ODI) आणि २० टी-२० सामने.
आयपीएल (IPL): २१२ सामने (६ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व).
कसोटी धावा: ५,०७७ धावा (सरासरी ३८.४६).
शतके: १२ कसोटी शतके (ज्यापैकी ८ शतके परदेशातील कठीण खेळपट्ट्यांवर – इंग्लंड १, न्यूझीलंड १, श्रीलंका २, वेस्ट इंडिज २ आणि ऑस्ट्रेलिया १).




