Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशकरोना प्रतिबंधक ‘गोळी’ लवकरच मिळणार

करोना प्रतिबंधक ‘गोळी’ लवकरच मिळणार

नवी दिल्ली –

- Advertisement -

करोना प्रतिबंधक लसीनंतर आता करोनाला रोखण्यासाठी लवकरच कॅप्सूल येणार आहे. विशेष म्हणजे भारतातच ही कॅप्सूल तयार

करण्यात येणार आहे.

प्रेमास बायोटेक नावाची कंपनी करोनावर कॅप्सूल तयार करत आहे. अमेरिकन कंपनी ओरामेड फार्मा या कंपनीच्या मदतीनं भारतात ही कॅप्सूल तयार होत आहे. या कॅप्सूलचं नाव ओरावॅक्स कोविड 19 कॅप्सूल आहे. या कॅप्सूलच्या ट्रायल्स सुरू असून ट्रायल्समध्ये कॅप्सूलनं उत्तम परिणाम दिल्याचं सांगण्यात आलं आहे.

एक कॅप्सूल घेतल्यावर शरीरात करोनाशी लढणार्‍या अँटीबॉडीज तयार होतील, असा दावा करण्यात आला आहे. या अँटीबॉडीज श्वसननलिका, पोट आणि आतड्यांचं करोनापासून संरक्षण करतील. करोनाशी लढाण्यासाठी एक कॅप्सूल पुरेशी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान, भारतात तयार करण्यात आलेली करोना प्रतिबंधक लस जगभरात वितरीत करण्यात आली आहे. भारतातही करोना लसीकरण जोरात सुरू आहे. करोना लसीचे दोन डोस घ्यावे लागत असून ही लस सुरूक्षित असल्याचे समजते. मात्र आता करोना रोखण्यासाठी कॅप्सूलही लवकरच येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या