Sunday, May 12, 2024
Homeदेश विदेशदेशाचा जागतिक विक्रम, प्रथमच दोन कोटी जणांचे लसीकरण

देशाचा जागतिक विक्रम, प्रथमच दोन कोटी जणांचे लसीकरण

नवी दिल्ली :

कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या (vaccination)कार्यक्रमाने गती घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (narendra modi)वाढदिवशी आज एकाच दिवसात देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली असून हा एक जागतिक विक्रम आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २ कोटीपेक्षा नागरिकांना लस देण्यात आले आहे.

- Advertisement -

भारताने कोरोना लसीकरण मोहीमेत आज नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात आज (17 सप्टेंबर)पाच वाजेपर्यंत दोन कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचा विक्रम झाला आहे. या अगोदर ३१ ऑगस्टला १.३३ कोटी नागरिकांना डोस देण्यात आला.

आज दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी एक कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला. यानंतर अवघ्या १०० मिनिटांनी हाच आकडा १.५० कोटींवर गेला. संध्याकाळी ४ वाजता लसीकरणाचा आकडा पावणे दोन कोटींच्या पुढे गेला.

IMD रविवारपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस

- Advertisment -

ताज्या बातम्या