Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइंडिगोने विमान प्रवास नकोच! ५५० उड्डाणे रद्द, DGCAची कारवाई; ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना...

इंडिगोने विमान प्रवास नकोच! ५५० उड्डाणे रद्द, DGCAची कारवाई; ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इंडिगो एअरलाइन्सची सेवा बुधवारपासून (३ डिसेंबर) विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (४ डिसेंबर) इंडिगोची सेवा आणखी कोलमडली. आतातर ही सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे ३८० उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक उड्डाणे विलंबाने झाली. यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. हा गोंधळ पुढील २-३ दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून ८ डिसेंबरपासून उड्डाणेही कमी करण्यात येणार आहेत.

दिल्लीमध्ये ९५, मुंबईत ८५, हैदराबाद ७० आणि बंगळुरूमध्ये ५० उड्डाणे रद्द करण्यात आली. देशातील इतर विमानतळांवरही हीच स्थिती होती. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांच्या एकत्रित आकडेवारीनुसार बुधवारी एअरलाइनचा नियोजित वेळेनुसार उड्डाणे कार्यरत ठेवण्याचा दर १९.७ टक्क्यांपर्यंत घसरला. २ डिसेंबर रोजी हा दर ३५ टक्क्यांहून अधिक होता.

- Advertisement -

काल (4 डिसेंबर) दिवसभरात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी 550 हून अधिक उड्डाने रद्द करण्यात आली. यात मुंबईतील 118, दिल्ली 172, बंगळुरूमधून 100, कोलकाता 35, चेन्नई 26 आणि गोव्यातील 11 उड्डाणांचा समावेश आहे. या शिवाय ज्या विमानांचे उड्डाण झाले त्यांनाही विलंब झाला. याचा प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत कामकाज सुरळीत करणे आणि वेळेवर उड्डाण करण्याला प्राधान्य राहील, असे इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी स्पष्ट केले आहे.

DGCA ने फटकारले
कामगिरीतील या घसरणीनंतर, डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले. एअरलाइनला सविस्तर कारणे देण्यास सांगितले. प्रतिसादात, इंडिगोने सांगितले की त्यांच्या १,२३२ उड्डाणांपैकी ७५५ उड्डाणे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे, ९२ एटीसी बिघाडामुळे, २५८ विमानतळ निर्बंधांमुळे आणि १२७ इतर कारणांमुळे रद्द करण्यात आली. डीजीसीएने सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन उपाययोजनांची शिफारस केली आहे.

इंडिगोतर्फे निवेदन
डीजीआयसीने इंडिगोवर कारवाई केली आहे. दरम्यान, इंडिगो कंपनीने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. कंपनीने सध्याच्या परिस्थितीबद्दल माफी मागितली आहे. लवकरच सामान्य कामकाज पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. “गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला आहे. आम्ही सर्व प्रवाशांची आणि भागधारकांची माफी मागतो. आमचे पथक सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी एमओसीए, डीजीसीए, बीसीएएस, एएआय आणि विमानतळ ऑपरेटर्सशी समन्वय साधत आहेत. ग्राहकांना नियमित अपडेट्स दिले जात आहेत आणि त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन केले जात आहे.

इंडिगोने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली त्यावर हवाई वाहतूक मंत्री नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंपनीला आपले कामकाज तातडीने सुरळीत करण्याचे तसेच भाडेवाढ न करण्याचे निर्देश दिले. विमान रद्द होण्यासंबंधी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या जाव्यात, हॉटेलमध्ये निवासासह प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे नायडू यांनी इंडिगोच्या अधिकाऱ्यांना बजावले.

नागरी हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सद्यस्थिती आणि उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी इंडिगोने डीजीसीएला सांगितले की, 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी केली जाईल, तसेच १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ववत स्थिर विमानसेवा सुरू होईल.

अमोल कोल्हेंनी व्यक्त केली नाराजी
इंडिगोच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसला आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी इंडिगोच्या सेवेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..! सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती… यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..! जय शिवराय, असे अमोल कोल्हेंनी पोस्ट करत म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थ कंत्राटात बोगसगिरी! विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल...

0
नाशिक | Nashik सिंहस्थमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नियोजनाची धावपळ सुरू असतानाच, काही संशयितांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयालाच लक्ष्य केले आहे. मेळ्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सीसीटीव्ही...