Friday, May 3, 2024
HomeUncategorized'इंडिगो'कडून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू

‘इंडिगो’कडून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू

औरंगाबाद – Aurangabad

इंडिगो’ (Indigo) कडून दिल्लीसाठी विमान पुन्हा सुरू केले आहे. दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली हे विमान (Delhi-Aurangabad-Delhi Airlines) सुरू करण्यात आले. या विमानाने दिल्लीहून शंभराच्या वर प्रवासी उतरले.

- Advertisement -

औरंगाबाद विमानतळावर (Aurangabad Airport) पुन्हा विमानांची लगबग सुरू होण्याचे संकेत मिळत आहे. ‘इंडिगो’ विमान कंपनीने दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली हे विमान सुरू करण्याची घोषणा केली होती. औरंगाबाद विमानतळावर दिल्लीहून साधारणत: दुपारी एक वाजेच्या दरम्यान विमान पोहोचले. या विमानातून औरंगाबादला ११२ विमान प्रवासी उतरले. तर दिल्लीकडे जाणाऱ्या या पहिल्या विमानाने औरंगाबादहून १२० प्रवासी निघाले. औरंगाबाद दिल्ली ही विमान सेवा सुरू झाल्याने औरंगाबादच्या प्रवाशांचा चांगलाच दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी औरंगाबाद विमानतळावरून मुंबई-औरंगाबाद-दिल्ली अशी एअर इंडियाचे विमान उड्डाण करीत होते. या विमानातून प्रवाशांना जास्त प्रवासभाडे द्यावे लागत होते. तर इंडिगोचे विमान दिल्लीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे सध्या साडे चार ते पाच हजार रुपयांमध्ये औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास होणार आहे. दिल्ली औरंगाबाद दिल्ली हे विमान आठवड्यातील तीन दिवस चालविण्यात येणार आहे. सोमवारी, बुधवार आणि शुक्रवार हे विमान दिल्लीकडे उड्डाण करणार असल्याची माहिती औरंगाबाद विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

इंडिगो एअरलाइन्स कंपनीने (Indigo Airlines Company) दिल्ली-औरंगाबाद-दिल्लीपाठोपाठ हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद हे विमानही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ जुलैला हे विमान सुरू करण्यात येणार आहे. हैदराबादहून हे विमान सकाळी ९.४५ वाजता उड्डाण होणार आहे. हे विमान औरंगाबादला सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. तर औरंगाबादहून हे विमान ११.४५ ला टेकऑफ होणार असून दुपारी १.३० वाजता हे विमान हैदराबादला पोहोचणार आहे. या विमानलाही चांगले प्रवासी मिळाल्याची माहिती इंडिगोच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या