Saturday, November 23, 2024
Homeदेश विदेशइंडिगोची नाशिक-बंगळुरू विमानसेवा 'या' तारखेपासून होणार सुरु

इंडिगोची नाशिक-बंगळुरू विमानसेवा ‘या’ तारखेपासून होणार सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या ओझर विमानतळावरून (Ozar Airport) विविध शहरांना जोडण्याचे काम इंडीगोने (Indigo) गतीने सुरु केले आहे. त्याच मालिकेत इंडिगो नवनवीन शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत नाशिक-बंगळुरू (Nashik-Bangalore) ही नवीन विमान सेवा येत्या १० जुलै रोजी सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ

नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या केवळ इंडिगो कंपनीची विमानसेवा (Airlines) सुरू आहे. या सेवांना नाशिककर तसेच अन्य भागातील प्रवासी चांगला प्रतिसाद देत असल्यानेच कंपनीने अनेक शहरांना जोडणारी सेवा सुरू केली आहे. अलिकडेच इंडीगोच्या दिल्ली (Delhi)सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वीच गोवा, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि इंदूर या शहरांना जोडणारी सेवा चांगली सुरू आहे. या सर्वच ठिकाणी कंपनीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने अहमदाबाद येथे दिवसातून दोन वेळा सेवा दिली होती.

हे देखील वाचां : Nashik Crime News : म्हसरूळला रिक्षाचालकाची हत्या

त्यातील एक शहराची सेवा अन्यत्र सुरू करण्यात आल्याने तूर्तास एकदाच ही सेवा सुरु आहे. इंडीगो विमान कंपनीच्या वतीने बंगळूरु, चेन्नई, कोलकत्ता, जयपूर या शहरांना जोडण्याची परवानगी उड्डयन मंत्र्यांकडे मागितलेली आहे. पुन्हा सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गतच नाशिक-बंगळुरू अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. बंगळूरु येथून दुपारी २.३० वाजता नाशिककडे प्रयाण करून ते नाशिकला सायं.४.२० ला पोहोचणार आहे. तर नाशिकहून परतीचा प्रवास सायं. ४.५० ला सुरु करुन सायं.६.३५ ला बंगळूरु गाठता येणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Fraud News : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने सहा कोटी रुपये उकळले

दरम्यान, नाशिकच्या (Nashik) धार्मिक पर्यटनासोबतच उद्योग क्षेत्रातील भेटींसांठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दक्षिण भारतातून येत असतात. त्यांनाही सेवा उपयुक्त ठरणार आहे. नाशिकहून त्यासाठी एअर बसचा वापर करण्यात येणार असून, ही सेवा दररोज राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या