Tuesday, February 3, 2026
Homeनाशिकनाशिकला स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण; सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल म्हणाले…

नाशिकला स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण; सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल म्हणाले…

नाशिक | Nashik
नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार निर्मिती, सेवा क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न विविध विकास कामाच्या माध्यमातून होत आहेत. या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे् देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मनपा उपायुक्त करिश्मा नायर आदींची उपस्थिती होती.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून त्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आलेली आहे. यासर्व कामांसाठी राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही. कुंभमेळ्याच्या आधी सर्व कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट प्रस्तावित केले आहेत. सर्व साधु-संत-महंत व विविध आखाड्यांचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामे केली जात आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाची साधने आदींचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळा हरित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

YouTube video player

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरकरीता मंजूर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा मध्ये झाला आहे. यापूर्वीच राज्य शासनाने या किल्ल्याचे जतन व संवर्धनासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.

या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...