Thursday, March 13, 2025
Homeक्राईमइंद्रा नुयींच्या नावे नगरच्या महिलेची 23 लाखांची फसवणूक

इंद्रा नुयींच्या नावे नगरच्या महिलेची 23 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

टेलिग्रामद्वारे संपर्क साधत टास्क पूर्ण करून गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर तालुक्यातील एका महिलेची सुमारे 23 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 26 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी नगर तालुक्यातील चास येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात 2 टेलिग्राम आयडी धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन पैकी एक आयडी भारतीय-अमेरिकन नागरिक आणि पेप्सी कंपनीच्या माजी जागतिक सीईओ इंद्रा नुयी यांच्या नावाशी साधर्म्य असणारे आहे. त्यांच्या नावाचा वापर फसवणूक करणारी टोळी सक्रीय असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

फिर्यादी महिलेच्या मोबाईल नंबरवर असलेल्या टेलिग्राम खात्यावर काजोल गालिब व इंद्रा नुयी असा 2 वेगवेगळ्या टेलिग्राम आयडीवरून मेसेज आले. त्यास फिर्यादीने प्रतिसाद दिल्यावर त्यांना बक्षीस मिळण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठवून टास्क पूर्ण करायला लावले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आम्ही सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक करा तुम्हांला आम्ही जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवले. गुंतवणुकीवर असे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांना आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून 26 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ऑनलाईन सुमारे 23 लाख 35 हजार 584 एवढी रक्कम घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्या दोन्ही टेलिग्राम आयडी धारक महिलांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दोन्ही टेलिग्राम आयडी धारक महिलांनी फिर्यादी यांना ब्लॉक केले. तब्बल 23 लाख 35 हजार 584 एवढी रक्कम गुंतवून त्यातून काहीच परतावा मिळाला नाही आणि ज्यांच्याकडे रक्कम गुंतवली त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि.3) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दोन्ही टेलिग्राम आयडी धारक अनोळखी महिला काजोल गालिब व इंद्रा नुयी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319 (2), 318 (4) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...