Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देश

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देश

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

- Advertisement -

अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ व महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियम २०११ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे आवश्यक आहे. या दलामार्फत स्थानिक पातळीवर अवैध दारूविषयक माहिती संकलित करून ती पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी सन २०१७ मध्ये जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायतींमध्ये प्रायोगिक स्वरूपात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले होते. मात्र, त्या दलांचा दोन वर्षांचा कार्य कालावधी संपल्यानंतर नव्याने दल स्थापन करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामरक्षक दलाची स्थापना सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस पाटील त्यांच्या कामात समन्वय साधतील. तसेच जिल्हाधिकारी श्रीप्रसाद यांनी तंटामुक्त गाव समितीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून समितीने पाणंद रस्त्यावरील वाद सोडवावेत, असेही नमूद केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू; भिंगारमध्ये तणाव

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भिंगार मधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्लेश्वर तरूण मंडळाचे कार्यकर्ते दीपक रामकिसन वाघस्कर (वय 50, रा. वाघस्कर मळा, भिंगार) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला...