Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकातील जुन्या कब्रस्तानात जागा अपुरी

नाशकातील जुन्या कब्रस्तानात जागा अपुरी

जुने नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात निधन होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यात जवळपास १७० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील जे जूने कब्रस्तान आहेत तेथे दफनविधी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे शासनाने आरक्षित केलेल्या कब्रस्तानच्या जागा मुस्लिम समाजाला बहाल करण्यात येऊन त्या ठिकाणी दफनविधी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी केली आहे.

- Advertisement -

शासनाने राखीव जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या सर्वत्र करोना वायरसची दहशत पसरली आहे, संपूर्ण जगात यामुळे हजारो लोकांचामृत्यू झाला आहे. तर नाशिक मध्ये देखील करोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशावेळी करोना व इतर विविध कारणांनी रोज अनेक जणांचे निधन होत आहे. यामुळे जुने नाशिक परिसरातील विविध कब्रस्तान मध्ये आता दफनविधीसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे शासनाने नानावली व वडाळागाव या ठिकाणी ज्या जागा कब्रस्तानसाठी राखीव केल्या आहेत, त्या जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात देऊन या ठिकाणी दफनविधीची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मागील सुमारे दोन महिन्यात नाशिक शहर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले आहे. एका दिवसात साधारण ८ ते १२ जणांचा मृत्यू होत आहे. मिळालेल्या माहितीनूसार मागील काही काळात एकूण सुमारे १७० जणांच्या दफनविधी शहरातील विविध कब्रस्तान मध्ये करण्यात आला आहेत, यामध्ये करोना रुग्णांचा देखील समावेेश आहे. राज्य शासनाच्या वक्फ मंडळाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील जवळपास सर्व कब्रस्तान मध्ये करोनामुळे दगावलेल्या लोकांच्या दफन विधी सुरु आहे. यामध्ये पीरजादा कब्रस्तान यांनी देखील मयत दफन करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

शासनाने गौळाणे याठिकाणी कब्रस्तानसाठी जागा दिली आहे मात्र येथील काही भाग वादग्रस्त ठरल्यानंतर व येथील जागा अत्यंत कडक असल्यामुळे येथे हाताने कबर खोदणे शक्य नाही म्हणून या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने कबर खोदण्यात येते, मात्र शहरापासून खूप दूर असल्यामुळे मुस्लिम बांधवाना त्रास होतो.चौक मंडई येथील जहांगीर मशीद कब्रस्तान, शालिमार जवळील रसुल बाग कब्रस्तान, द्वारका जवळील काजी कबरस्तान तसेच वडाळा येथील कब्रस्तान आदींमध्ये करोना व इतर कारणांमुळे मयत झालेल्या मुस्लिम बांधवांच्या दफनविधी झाला आहे, मात्र आता नवीन जागा शिल्लक नसल्यामुळे शासनाने नानावली व वडाळा याठिकाणी जी जागा कब्रस्तानसाठी राखीव ठेवली आहेत, त्या जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्याव्यात, जेणेकरून याठिकाणी दफनविधी करण्यासाठी सोपे जाईल.

शासनाने मुस्लिम समाजाच्या मागणीचा विचार करावा तसेच ज्या जागा कब्रस्तान साठी राखीव करण्यात आल्या आहेत त्या जागा समाजाच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी दफनविधी परवानगी द्यावी, करोनामुळे जागा कमी पडत आहे.

हाफिज हिसामुद्दीन अशरफी (खतीब ए नाशिक)

समाजातील धार्मिक, राजकीय व सामाजिक नेत्यांनी पुढे येऊन या गंभीर प्रश्नाला त्वरित मार्गी लावावा,दफनविधीसाठी जागेचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहे. वेळीच जर दफनविधीसाठी जागा मिळाली पाहिजे.

रफिक साबीर (दफनविधी सहाय्यक)

- Advertisment -

ताज्या बातम्या