Friday, May 3, 2024
Homeनाशिकपावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा- आ. फरांदे

पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा- आ. फरांदे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिका ( NMC ) अंतर्गत पावसाळ्यापूर्वी ( Pre- Mansoon Work ) करण्यात आलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे ( MLA Devyani Farande ) यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे केली.

- Advertisement -

महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडणे, अपूर्ण रस्त्यांची कामे तो पूर्ण आदि पावसाळ्यापूर्वीची कामे ही सहा जून पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र नगरपालिकेने पावसाळ्या पूर्वीची कामे करण्यात मोठ्या प्रमाणावर अनियमित केली. याचा परिणाम म्हणून नाशिक शहरात पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले.

गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले. अनेक व्यवसायिकांच्या दुकानात पाणी जाऊन नुकसान झाले. 6 जून झाल्यानंतर देखील कामे पुर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली तसेच लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाढलेले होतेेे. कामे पूर्ण न करणारे ठेकेदार, अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आ. फरांदे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या