Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजIPL Auction : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव भारताबाहेर होणार?

IPL Auction : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव भारताबाहेर होणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेचा २०२५ चा हंगाम अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व १० संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र,आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशातच आता या लिलावासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

याबाबत अधिक माहिती अशी की, २०२५ मध्ये आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. यासंदर्भात नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.मागील ३ वर्षांच्याप्रमाणे मेगा लिलाव (Auction) दोन दिवस पार पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयपीएल लिलाव पार पडण्यापूर्वी संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये पार पडलेल्या मेगा लिलावात स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना जास्तीत जास्त ४ खेळाडू कायम राखण्याची परवानगी देण्यात आली होती.मात्र, आता तीन वर्षांच्या कालावधी संपल्यानंतर जास्तीत जास्त खेळाडूंना कायम राखण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.तर काही संघ आपल्या संघातील ८ खेळाडू कायम राखण्यासाठी उत्सुक आहेत.

हे देखील वाचा : Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

बीसीसीआयने (BCCI) १५ नोव्हेंबरपर्यंत आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी सांगितले आहे. आयपीएल २०२५ मध्ये अनेक संघांच्या सपोर्ट स्टाफमध्ये बरेच बदल पहायला मिळण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्ज संघाने पुढील हंगामासाठी रिकी पाँटिंगची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्स संघानेही झहीर खानची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. तर भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे.दुसरीकडे आयपीएल २०२४ स्पर्धेचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या