Tuesday, October 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; 'या' पक्षात...

Sanjay Pandey : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) तोंडावर येऊन ठेपली असून या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. यामध्ये काही माजी पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. यात आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची देखील भर पडली असून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्याआधी पांडे हे अधिकृतरीत्या आज एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये (Congress) पक्षप्रवेश करणार असून ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत (Mumbai) काँग्रेसची एक बैठक पार पडणार आहे. यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेस मुंबई अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड (MP Varsha Gaikwad) यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील वाचा : One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे काय? फायदे आणि आव्हाने कोणती? जाणून घ्या सविस्तर

काही महिन्यांपूर्वी संजय पांडे यांनी फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. यानंतर अनेक जण संजय पांडे कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दल तर्क-वितर्क लढवत होते. अखेर आता ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेसाठी जिल्ह्यातील ‘या’ दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर

संजय पांडेंना फोन टॅपिंग प्रकरणात झाली होती अटक

संजय पांडे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी (IPS officer) आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. पांडेंनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषवले आहे. पांडे अनेकदा वादात अडकले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. संजय पांडे पोलीस महासंचालकपदी असताना, त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही झाला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या