नवी दिल्ली | New Delhi
आयपीएलमध्ये आज (गुरुवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders) आव्हान असणार आहे. लखनौ सुपर जायंट्स कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ईडन गार्डन्स मैदानावर तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून, दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला आहे. तसेच स्पर्धेमध्ये एकूण ६ सामने खेळले असून, लखनौ सुपर जायंट्स ने ४ तर कोलकाता नाईट रायडर्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.
लखनौ सुपर जायंट्सने यंदाच्या हंगामात २ सामने खेळले असून, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय संपादन केला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या हंगामात आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाब किंग्ज विरूध्दचा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खात्यात १ गुण जमा असून, संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) सोपविण्यात आले आहे. तर रिषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्स मैदानावर ९० सामने खेळले असून,५३ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ३७ सामन्यात पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २५ सामने जिंकले असून,२८ सामने लक्षाचा पाठलाग करताना जिंकले आहेत.




