Tuesday, June 16, 2026
HomeनाशिकNashik BJP News : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई...

Nashik BJP News : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – भाजप आमदारांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

नाशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नाशिकचे (Nashik) नाव राज्यभर चांगलेच चर्चेत आहेत. आधी अशोक खरातचे (Ashok Kharat) प्रकरण नंतर रविंद्र एरंडेचे कांड आणि त्यानंतर आता मुंबई नाका परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतरण करण्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांची भेट घेत संशयित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…

नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) आणि नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे (MLA Seema Hiray) यांनी आज (शनिवारी) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, मनपा गटनेते ॲड. श्री शाम बडोदे, सरचिटणीस सुनील देसाई, रश्मी हिरे ,नगरसेविका स्वाती भामरे , संध्या कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये कसं उतरलं? मंत्री भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ” हा अपघात…

या निवेदनात “महिला सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणांना अधिक गांभीर्याने घेऊन दोषींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासन प्रभावीपणे कार्य करत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे, याचा आम्हाला विश्वास आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Tushar Bhosale : “मौलाना शरद पवार जाळीदार टोप्या घालून इफ्तार…”; ‘त्या’ विधानावरून भाजपच्या तुषार भोसलेंची जोरदार टीका

महिलांसाठी ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम राबवावी

तसेच नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करून “झिरो टॉलरन्स” मोहीम राबवून महिलांमध्ये जनजागृती करण्यात यावी.तर अन्याय होत असल्यास महिला व तरूणींनी कुठलीही भीती न बाळगता थेट पोलिसांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही यावेळी आमदारांनी निवेदनाद्वारे केले. तसेच देवाभाऊंचे सरकार महिला सुरक्षेबाबत पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा :  Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

शहरात वाढणारी गुन्हेगारी गंभीर समस्या

नाशिक (Nashik) येथे होणार्‍या जागतिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर तयारी करत असताना शहरात वाढणारी गुन्हेगारी, लैंगिक अत्याचार, अतिक्रमण, नशेखोरी व ड्रग्स माफिया यांसारख्या समस्या हा एक गंभीर विरोधाभास निर्माण करत आहेत. या सर्व प्रकरणांचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यात येऊन यावर तात्काळ कारवाई करावी व महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात. कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातची उलाढाल सापडलीच ! ईडीकडून अशोकसह कल्पनाची चार बँक खाती गोठवली

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...