Tuesday, August 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही -...

Maharashtra News : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही – उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

मुंबई | Mumbai

कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या शरीराकडे एकटक पाहणे अनैतिक असले तरी ते भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-सी अंतर्गत ‘व्हॉयरिझम’चा गुन्हा ठरत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने (High Court) दिला. हा निर्वाळा देत न्यायालयाने एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्धचा एफआयआर (FIR) रद्द केला.अशा वर्तनावर कंपनीच्या अंतर्गत समितीमार्फत कारवाई होऊ शकते, परंतु ते गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. 

- Advertisement -

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड करताना पायलटची गंभीर चूक; मोठा अनर्थ…

न्यायमूर्ती (Justice) अमित बोरकर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने एका विमा कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आणि  कायद्याचा विस्तार स्पष्ट शब्दांपलीकडे करता येत नाही. खटला पुढे चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे न्यायालयाने नमूद केले. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, मिटींगदरम्यान आरोपी नजरेला नजर न देता तिच्या शरीराच्या अवयवांकडे एकटक पाहत असे आणि असभ्यपणे टिप्पणी करीत असे. कंपनीच्या अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) या प्रकरणात यापूर्वीच आरोपीला निर्दोष ठरवले होते. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने (Court) महत्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये कसं उतरलं? मंत्री भुजबळांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ” हा अपघात…

कायदेशीर तरतूद परनिरीक्षणाच्या गुन्ह्याची व्याख्या करते आणि त्यासाठी शिक्षा देते. यात एखाद्या स्त्रीच्या खाजगी कृत्यादरम्यान तिला पाहणे, तिची छायाचित्रे घेणे किंवा ती प्रसारित करणे यांचा समावेश होतो. महिलेच्या शरीराचे खाजगी अवयव उघडे असतात, स्त्री स्वच्छतागृहाचा वापर करत असते, किंवा सार्वजनिक ठिकाणी सहसा न केले जाणारे लैंगिक कृत्य करत असते, अशा परिस्थितींना कायदेशीर तरतूद लागू होते. मात्र कार्यालयीन ठिकाणी महिलेकडे एकटक पाहणे हे गुन्हेगारी श्रेणीत येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हे देखील वाचा :  Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना आयशर ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात श्रावणसरींचा जोर

0
भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याचे जिवनदायिनी भंडारदरा आणि निळवंडे धरण तुडूंब असून काल सोमवारी श्रावणसरींचा जोर वाढल्याने धरणातून पाणी आणखी सोडण्यात येण्याची शक्यता...