Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमधक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

लखनौ | Lucknow

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमधील राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या (Manohar Lohia National Law University) वसतिगृहात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह सापडला. अनिका रस्तोगी (Anika Rastogi) असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बीए एलएलबी (ऑनर्स) तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. अनिका आयपीएस (IPS officer) संतोष रस्तोगी यांची मुलगी आहे. संतोष रस्तोगी सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत कार्यरत आहेत.

हे देखील वाचा पुणे हादरलं! आधी गोळीबार, नंतर कोयत्याने वार करत माजी नगरसेवकाची हत्या

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की अनिका वसतीगृहातील तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली होती. ती जमिनीवर पडली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अनिकाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

हे देखील वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतूक बंदीचा पेट्रोल पंपांना फटका

पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनिकाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जे काही सत्य समोर येईल ते पुढे शेअर करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या