Wednesday, February 19, 2025
Homeदेश विदेशISRO SPADEX: भारतासाठी अभिमानाचा क्षण! ISRO चे अंतराळ जगतात आणखी एक ऐतिहासिक...

ISRO SPADEX: भारतासाठी अभिमानाचा क्षण! ISRO चे अंतराळ जगतात आणखी एक ऐतिहासिक पाऊल

जगात अशी कामगिरी करणारा ठरला चौथा देश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रोने आज भारतीय अंतराळ जगतात आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. स्पॅडेक्स (SPADEX) मिशन अंतर्गत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरलाय. याआधी फक्त रशिया, चीन आणि अमेरिका या देशांनी असा पराक्रम केलाय. गुरवारी (दि.१६) जानेवारी रोजी अंतराळात दोन अंतराळयानांना यशस्वीरीत्या डॉक करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. इस्रोने याबाबत अधिकृत माहिती दिली.

स्पॅडेक्स (SPADEX) मिशन अंतर्गत, हे तंत्रज्ञान अंतराळात दोन अवकाश यानांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करते. यामुळे भविष्यातील मनुष्यबळ असलेल्या अंतराळ मोहिमा, अंतराळातील देखभाल, तसेच यानांच्या इंधन भरावासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या क्षेत्रात आघाडीवर असून भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

- Advertisement -

इस्रोने या ऐतिहासिक यशसासाठी सगळ्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. स्पेडेक्स मिशनची डॉकिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच इस्रोकडून सांगण्यात आले. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. १५ मीटर ते ३ मीटर होल्ड पॉइंट पर्यंत आणण्याची प्रोसेस पूर्ण झाली. स्पेसक्राफ्टला यशस्वीरित्या कॅप्चर करण्यात आले. अवकाशात यशस्वी डॉकिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. डॉकिंग म्हणजे अवकाशात कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांच्या जवळ आणणे, त्यांना जोडणे.

३० डिसेंबर २०२४ रोजी इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती. या अंतर्गत PSLV-C60 रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून ४७० किमी वर दोन अंतराळ यान तैणात करण्यात आले. सात जानेवारी या मोहिमेअंतर्गत २ अंतराळयान जोडले जाणार होते, पण काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले होते. ९ जानेवारी रोजी डॉकिंगचा प्रयत्न करण्यात आला, पण प्रयोग अयशस्वी झाला. आज डॉकिंग करण्यात यश आले.

गगनयान, चांद्रयान-4 आणि भारतीय अंतराळ स्थानकाच्या यशावर आधारित मोहिमा आहेत. चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. गगनयान मोहिमेअंतर्गत मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे स्पेडेक्स मिशन इस्रोसाठी महत्त्वाचे होते. आज त्याला यश मिळाले आहे. हे तंत्रज्ञान भारताच्या चंद्रावरील मोहिमेसाठी, चंद्रावरून नमुने परत आणणे, भारतीय अंतराळ स्थानकाचे बांधकाम आणि ऑपरेशन (BAS) इत्यादी भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षेसाठी आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
गुड मॉर्निंग इंडिया! अंतराळ इतिहासात भारताने आपले नाव कोरले आहे. इस्रोच्या स्पेसएक्स मिशनला ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे. या क्षणाचे साक्षीदार असल्याचा अभिमान वाटतो, असे ट्वीट इस्रोकडून आज सकाळी करण्यात आले. इस्रोच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलेय. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या