Tuesday, September 29, 2026
HomeनगरBelapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

Belapur : चंपत राय यांच्या जागी बेलापूरचे भूमिपूत्र

अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत नुतन पदाधिकार्‍यांची निवड

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी यांची अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या महासचिवपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. काल अयोध्या येथे श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यात पुर्वीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांची महासचिवपदी तर दिल्ली येथील परोपकारी व्यक्तिमत्व असलेले महेश भागचंद यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अयोध्येचे माजी लोकप्रतिनिधी मदन मोहन पांडे आणि शिकोहाबाद येथील शिक्षणतज्ज्ञ निर्मला यादव यांची विश्वस्तपदी नियुक्ती झाली आहे.

- Advertisement -

बेलापूरला आनंदोत्सव साजरा
बेलापूरचे भूमिपुत्र तसेच राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी यांच्या निवडीचे वृत्त समजताच गावात फटाक्यांची आतिषबाजी तसेच जय श्रीरामच्या घोषणा देत ग्रामस्थ आणि श्रीराम भाविक भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट…

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतरवाली सराटीतील २० दिवसांच्या...