Friday, May 3, 2024
Homeनाशिकउद्योजकांनी दक्षता घेतल्यास दिवाळीत उद्योगक्षेत्र सुरक्षित ठेवणे शक्य : पोलीस उपायुक्त

उद्योजकांनी दक्षता घेतल्यास दिवाळीत उद्योगक्षेत्र सुरक्षित ठेवणे शक्य : पोलीस उपायुक्त

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये दिवाळीमध्ये दि १३ नोव्हेंबर ते १८ नाव्हेम्बर या काळात कारखान्यांना सलग सुटी असणार आहे.

- Advertisement -

या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या चोऱ्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी घ्यावयाची काळजी व करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या मार्गदर्शनासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्टरर्स असोसिएशन (आयमा)ने आयाम सभासद इतर औद्योगिक संघटनंबररोबर सुरक्षेसाठी पोलीस अधिकाऱयांसमवेत आज मंगळवार १०. ११. २० रोजी ४ वा. आयामा रिक्रिएशन सेंटर येथील के आर बुब हालमध्ये बैठक बोलावली होती. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात, आयमा अध्यक्ष वरूण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, आयपीपी राजेंद्र अहिरे तक्रार समितीचे चेअरमन विनायक मोरे होते.

यावेळी आयमचे अध्यक्ष वरून तलवार यांनी आयामा विषयी माहिती दिली. व आयामा दरवर्षी दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत चोऱ्या होऊ नयेत म्हणून पोळलीसांच्या मदतीने उद्योजक सुरक्षारक्षक लेबर कंट्राक्टर यांच्याकरिता अशा प्रकारच्या बैठकीचे नियोजन करीत असते.

आयाम करीत असलेल्या निययोजनामुळे गेल्या सात वर्षांपासून औद्योगिक वसाहतीत चोऱ्या झालेल्या नसल्याचे सांगून उद्योजक व पोलीस यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आल्याचे सांगितले यापार्श्‍वभूमीवर यंदा ही बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्यादृष्टीने बैठकीचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले आहे.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त खरात यांनी औद्योगिक वसाहतीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस दलातर्फे सतर्कता बाळगली जाईल. व बंदोबस्तात वाढ करण्यात येईल. या बैठकीत पोलिसांकडून पोलीस गस्त वाढवणे, बॅरीकेटींग करने,

नाकाबंदी करणे वाहन तपासणी करणे बीट मार्शलची संख्या वाढवणे या सारख्या उपाय योजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

दिवाळी सुटीमध्ये आयमा तर्फे रात्रीच्या गस्तीसाठी एक सातपूर व अंबड साठी एक वाहन देण्यात येणार आहे. याकाळात रात्रभर बंदोबस्त राहणार आहे . उद्योजकांनी आपल्या कारखान्यात काही प्रमाणात काळजी घेतल्यास योग्य उपाय योजना केल्यास स्वा-चीच दिवाळी आनंदात जाईल असे सांगितले.

या वेळी उद्योजक व यांच्यात प्रश्नउत्तर झाली. सूत्रसंचालन आयमचे माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले. तर आभार आयामांचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांनी मानले.

यावेळी उपस्थित सुदर्शन डोंगरे, अविनाश मराठे, एन डी ठाकरे,सतीश कोठारी विजय जोशी दिलीप वाघ एम व्ही गीते अमित शेट्टी गोविन्द झा राजेंद्र कोठावदे देवेंद्र राणे विराज गडकरी जयंत जोगळेकर लोकेश पीचया आदी उद्योजक व कान्ट्रॅक्त्र उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या