नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेने भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. अनेक देश हे अमेरिकेच्या या निर्णयाच्या विरोधात पुढे आले. भारतातून अमेरिकेत होणारी ७० टक्के निर्यात कमी झाली आहे. याचा फटका भारतीय उद्योगांना देखील बसलाय. या टॅरिफचे समर्थन आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे. जर रशियाला ताकद देणाऱ्या देशाविरुद्ध अमेरिकेने कठोर भूमिका घेतली असेल तर त्यात काय चूक आहे असे म्हंटले आहे.
वोलोदिमिर झेलेस्की यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारतावर अमेरिकेने लावलेला ५० टक्के टॅरिफ अगदी बरोबर असल्याचे म्हटले, ज्याने खळबळ उडाली. वोलोदिमिर झेलेस्की यांनी मुलाखतीमध्ये म्हटले की, भारत, चीन आणि रशिया एकाच मंचावर आले, त्यावेळी मला त्यांच्यामध्ये जुगलबंदी दिसली. मला स्पष्ट वाटते की, भारतावर अमेरिकेने जो टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे.
झेलेन्स्की यांनी चीन, रशिया आणि भारताचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याबाबतही प्रतिक्रिया दिली. ‘भारतावर कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य आहे असे मला वाटते. रशियासोबत व्यवसाय करणाऱ्यांवर निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे झेलेन्स्की म्हणाले.
‘ट्रम्प सरकारने उचललेल्या पावलांवर मी खूश आहे. रशियाशी कोणत्याही प्रकारचा करार करणे योग्य नाही. मी त्यावर निर्बंधांना पाठिंबा देतो. डोनाल्ड ट्रम्प यांना माहित आहे की व्लादिमीर पुतिन यांना कसे रोखता येईल. व्लादिमीर पुतिन यांचे शस्त्र असे आहे की ते जगातील अनेक देशांना तेल आणि वायू विकतात. त्यांची ती शक्ती हिसकावून घ्यावी लागेल, असेही झेलेन्स्की म्हणाले.
काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या बैठकीत रशिया, चीन आणि भारत देशांदरम्यान बैठक झाली होती. या बैठकीवर बोलताना झेलेन्स्की म्हणाले, भारतावर शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय योग्य आहे असे मला वाटते. रशियासोबत व्यवसाय करणाऱ्यांवर निर्बंध लादणे आवश्यक आहे. अलास्का शिखर परिषदेबद्दल विचारले असता, व्होलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले की, मी तिथे नव्हतो. या बैठकीद्वारे ट्रम्प यांनी पुतिन यांना जे काही हवे होते ते दिले.
भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता सातत्याने दबाव टाकण्याचे काम अमेरिकेकडून सुरू आहे. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी या मान्य केल्या नाहीत. एवढेच नाही तर अमेरिकेच्या नाकावर टिच्चू भारताने रशियासोबत अजून काही महत्वाची करार तेलाबाबत केली आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




