Friday, May 3, 2024
Homeनाशिकजगदंबा माता मंदिर (पोशेरा) जीर्णोद्धार सोहळा संपन्न

जगदंबा माता मंदिर (पोशेरा) जीर्णोद्धार सोहळा संपन्न

मोखाडा l Mokhada (वार्ताहर)

ईच्छाशक्ती असेल तर तरुणाई मिळून काय करू शकते याचे मुर्तीवंत उदाहरण मोखाडा तालुक्यातील पोशेरा या ठिकाणी पहावयास मिळाले.

- Advertisement -

गावच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणारे येथील तरुण अध्यात्मिक बाबतीतही मागे नाहीत हे दिसूनआले. प्राचीन एतिहासिक जगंदबा मंदिर असलेल्या यागावातील तरुणांनी स्ववर्गणीतुन गावातल्या शिकलेल्या नोकरीला लागलेल्या तरुणांनाकडुन संपर्क करून हे भव्य मंदिर उभारले.

या मंदिराचा जीर्णोद्धारही अध्यात्माची जोड असलेल्या आ. सुनिल भुसारा यांच्याशी संपर्क केला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नियोजित कार्यक्रम असतानाही आ. सुनिल यांनी सगळे कार्यक्रम रद्द करून या जीर्णोद्धार कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

भरीव मदत करून या ठीकाणी शौचालय, न्हानीघरासाठी निधीही उपलब्ध करून देण्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या