Thursday, July 23, 2026
HomeनाशिकAshok Kharat Case: जगदंबा पतसंस्था ३२ बनावट खात्यांमधील व्यवहारांची होणार चौकशी; नामकर्ण...

Ashok Kharat Case: जगदंबा पतसंस्था ३२ बनावट खात्यांमधील व्यवहारांची होणार चौकशी; नामकर्ण आवारेंना पोलिस कोठडी

सिन्नर | प्रतिनिधी
सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन तथा जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नामकर्ण आवारे यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आवारे बुधवारी (दि.१३) दुपारी १ च्या दरम्यान वसाहतीच्या कार्यालयातून बाहेर पडून वसाहतीच्या वाहनात बसून निघताच पोलीसांनी थेट आपले वाहन आवारे यांच्या वाहनाला आडवे लावले व एक-दोन पोलीस थेट आवारे यांच्याच वाहनात बसले. आवारे व चालकाचा मोबाईल त्यांनी ताब्यात घेतला व त्यानंतर थेट दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आवारे यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर चालकाला त्याचा मोबाईल देण्यात आला.

आवारे यांना दुपारी न्या. एल. सी. वाडीकर यांच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. सरकारी वकिल जगदीश पाटील यांनी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद करत आवारे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, आवारे यांचे वकिल अॅड. राहूल कासलीवाल, विनोबा गोळेसर, शिवराज नवले यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. पोलिसांनी आवारे यांना साक्षीदार म्हणून नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर थेट त्यांना अटक करणे न्यायाला धरुन नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

आवारे यांचे वय ६५ असून त्यांची एन्जीओप्लास्टी झाली असून त्यांना उच्च रक्तदाब व इतर आजारही आहेत. त्यांना गोळ्या औषधे घ्यावी लागतात. पोलीस कोठडी घेतल्यास त्यांचा आजार बळावू शकतो असा युक्तीवाद त्यांनी केला. मात्र, त्याचवेळी जगदंबा पतसंस्थेतील बनावट ३२ खात्यांमधून काढलेली रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काढली का याबाबत चौकशी करायची आहे. पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर कुणी दबाव टाकला का?, त्याला अन्य कुणी कर्मचारी अथवा संचालकाने मदत केली का? याबाबत तपास करायचा आहे. आणखी काही पतसंस्थांमध्ये अशीच बनावट खाती उघडून काही व्यवहार केले आहेत का याचाही तपास करायचा असल्याचे सरकारी वकील पाटील यांनी न्यायालयाला सांगितले.

Ashok Kharat Case: ज्या तरुणीला हाताशी धरून खरातनं खोटी तक्रार नोंदवली, त्याच तरुणीनं सत्याची साथ दिली, खरातचा फेक नॅरेटिव्ह उघड

जगदंबा पतसंस्थेतून एकावेळी दोन लाखच रुपये काढता येतात. त्यासाठीही पॅनकार्ड देणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतांनाही पतसंस्थेतून ५-९ लाखांची रक्कम वेळोवेळी काढण्यात आली आहे. त्यातून काही गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबतही तपास करायचा आहे. कॅप्टन खरात व आवरे हे पूर्वीपासून एकमेकांचे परिचित आहेत. खरातने आवारे यांना शिवनिका संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या चिटणीसपदी बसवले होते. त्यामागे त्याचा काही उद्देश होता का याबाबत तपास करावयाचा आहे.

त्यामूळे आवारे यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पाटील यांनी न्यायालयाकडे केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आवारे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, त्याचवेळी आवारे यांना आवश्यक असणारी औषधे कोठीडीत दिली जावीत असे स्पष्ट केले.

दोघांना समोरासमोर बसवणार?
खरात याने बनावट खात्यातून रक्कम काढल्यानंतर रक्कमेच्या दोन टक्के रक्कम आवारे यांना दिल्याचे पोलिसांच्या उलट तपासणीत सांगितल्याची चर्चा आहे. त्यामूळे खरात हे आवारेंना अडकविण्यासाठी तर असे जबाब देत नाहीत ना अशी चर्चा शहरात होत आहे. सिन्नर पोलीस ठाण्यातील पहिली रात्र खरात व आवारे यांनी वेगवेगळ्या मात्र, शेजारच्याच कोठडीत काढल्याची चर्चा आहे. आवारे यांच्या जावयाच्या नावानेही ३२ पैकी १ बनावट खाते होते. आपल्या जावयाचे खाते असल्याचे आवारे यांना खरेच माहिती नव्हते का याबाबतही उलट-सुलट चर्चा होत आहे. पोलीसांनी आत्तापर्यंत दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली आहे. मात्र, आवारे यांना कोठडी मिळाल्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातून अजून पतसंस्थेतील कोणा-कोणाची नावे पूढे येतात याबाबत शहर व परिसरात दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

राहुल

Rahul Gandhi: “तुम्हीच आमच्या तरुणांच्या”; पंतप्रधानांच्या घोषणेला राहुल गांधींच प्रत्युत्तर, मोदींनाच...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)...