Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedभुसावळ : मध्य रेल्वेने १५३० टन जीवनावश्यक वस्तूंची केली वाहतूक 

भुसावळ : मध्य रेल्वेने १५३० टन जीवनावश्यक वस्तूंची केली वाहतूक 

मध्य रेल्वेने लाॅकडाऊन काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण,नागपूर,भुसावळ, सोलापूर,पुणे,नाशिक येथून  १५३० टन जीवनावश्यक वस्तूंची विविध ठिकाणी वाहतूक केली.  जीवनावश्यक वस्तूंमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे,फळे,भाज्या, अंडी,ज्युट बियाणे,टपाल बॅग्स आणि कच्चा माल यांचा समावेश आहे.  तपशील खालीलप्रमाणे आहेतः
गुवाहाटी, नागपूर, वाडी, सोलापूर येथे औषधे व वैद्यकीय उपकरणे;
बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, टाटानगर, गुवाहाटी, कोलकाता येथे फळे, भाज्या व किराणा,चेन्नई, भागलपूर, कोलकाता, भुसावळ, नाशिक आणि नागपूर येथे पोस्टल बॅग्स, ज्यूट बियाणे, पार्सल बॅग्स पाठविण्यात आले.
त्याचप्रमाणे पाथरी, पोरबंदर, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथून  मध्य रेल्वेतील  नागपूर, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, कलाबुरागी, मनमाड, भुसावळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या  स्थानकांवर औषधे, पोस्टल बॅग,भाजीपाला, खाद्यपदार्थ, दुधाची उत्पादने, पतंजली उत्पादने आणि जड पार्सल यांची आवक झाली.
- Advertisment -

ताज्या बातम्या